Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2.
Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2.
Sarkari Exam.
1) अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण उद्देश असलेल्या कोणत्या योजनेचा प्रारंभ जानेवारी, 2016 मध्ये जम्मू व काश्मिर येथे झाला ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2)
Answer == नई मंझिल.
2) भारतीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे योजिले आहे. हे संग्रहालय ______ शहरात असेल. (Maharashtra ASO Exam 2017 – Main Paper-2).
Answer == नवी दिल्ली.
3) ब्रिक्स्-ए.आर.पी.ची स्थापना करण्यासाठी भारत आणि विविध ब्रिक्स देशांमधील एका सामंजस्य करारास (एम ओ यू ) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या कराराची _______ उद्दिष्ट्ये आहेत. (Maharashtra ASO Exam 2017 – Main Paper 2).
Answer == निरंतर शेती विकास.
4) जर ‘MACHINE’ या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20-11′ असा असेल तर ‘DANGER’ या शब्दाला संकेत तुम्ही कसा लिहाल ? (पुणे ग्रामीण पोलीस भरती परीक्षा-2021).
A. 11-7-20-16–11-24
B. 13-7-20-9-11-25
C. 10-7-20-1-11-24
D. 13-7-20-10-11-25
Answer == C.
5) राम कृष्णा आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर हि बेरीज किती वर्ष होईल? (पुणे ग्रामीण पोलीस भरती परीक्षा-2021)
Options == 1)60. 2) 30. 3)75. 4)45
Answer ==
6) POCSO ACT हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? (पुणे ग्रामीण पोलीस भरती परीक्षा-2021).
Options == 1) बाल लैंगिक अत्याचार .2) बालविवाह .3) विधवा पुनर्विवाह . 4) अवयव तस्करी.
Answer == बाल लैंगिक अत्याचार.
7) इसवी सण 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ——यांनी घेतला. (पुणे ग्रामीण पोलीस भरती परीक्षा-2021)
Options == 1) गव्हर्नर एल्फिन्स्टन 2) लॉर्ड कर्झन 3) छत्रपती शाहू महाराज 4) सयाजीराव गायकवाड
Answer == छत्रपती शाहू महाराज.
8) माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र —– तालुक्यात आहे? (पुणे ग्रामीण पोलीस भरती परीक्षा-2021).
Options == 1) शहापूर 2) संगमनेर ३)सिन्नर 4) जुन्नर.
ANSWER == जुन्नर.
9) भाटघर धारण कोणत्या नदीवर आहे ? (पुणे ग्रामीण पोलीस भरती परीक्षा-2021).
Options == 1) भीमा. 2) पवना. 3) येळवंडी. 4) इंद्रायणी.
Answer == येळवंडी.
10) पुणे जिल्ह्यातील —– तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. (पुणे ग्रामीण पोलीस भरती परीक्षा-2021).
Options == 1)भोर. 2)दौंड. 3)बारामती. 4)इंदापूर.
Answer == इंदापूर.
11) हे ——सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. (पुणे ग्रामीण पोलीस भरती परीक्षा-2021).
Options == 1)दीनमित्र 2)मूकनायक 3)दीनबंधू 4)दलित मित्र.
Answer == दीनबंधू.
12) सातपुडा दोन भागात _______ मुळे विभागला जातो. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2)
Options == 1) अजिंठा फट 2) नर्मदा फट 3)बहानपुर फट 4)सातमाळा फट Answer == बहानपुर फट.
13) तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options == 1) जळगाव 2)नाशिक 3)नंदूरबार 4)धुळे.
Answer == नंदूरबार.
14) माहिती अधिकार कायदा, 2005 च्या कोणत्या तरतूदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला आहे ?(Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options == 1)कलम 2. 2)कलम 3. 3)कलम 4. 4)कलम 5.
Answer == कलम 3.
15) माहितीचा अधिकार हा ______ आहे. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options == 1) संविधात्मक अधिकार. 2)घटनात्मक अधिकार. 3) वैधानिक अधिकार. 4) वरीलपैकी काहीही नाही.
Answer == वैधानिक अधिकार.
16) ________ म्हणजे ज्या सिस्टिममध्ये सिक्युर की ची जोडी असून त्यातील “प्रायव्हेट की’ ही डिजिटल सिग्नेचर तयार करते व “पब्लिक की” वापरून त्याचा पडताळा करते. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options == 1) असर्टीन क्रिप्टो सिस्टिम. 2)अॅक्टिंग क्रिप्टो सिस्टिम. 3)असिंक्रोनस क्रिप्टो सिस्टिम. 4)असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टिम.
Answer == असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टिम.
17) संगणकांत छापील प्रतिमा साठविण्याकरता वापरण्यात येणा-या उपकरणास काय संबोधले जाते ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
1) मॉनिटर 2)प्रिंटर 3) स्कॅनर 4) वरीलपैकी नाही.
Answer == स्कॅनर.
18) माहितीचा अधिकार अधिनियम या उद्देशाने पारीत केला आहे ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options==
A. सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणणे
B. सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामात जबाबदारी आणणे
C. माहिती आयुक्तालयांची स्थापना करणे.
D. वरील सर्व.
Answer == D.
19) भारताच्या ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट (MHRD) ने डिजिटल लर्निग क्षेत्रातील डिझाईनमधील आयसीटी वापर करून तयार केलेली प्रणालीचे नाव _______ आहे. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options ==
A. इ-सागू. B. इ-ट्युटर. C. इ-कल्पा D. इ-शिक्षा.
Answer == इ-कल्पा.
20) एम.एच.आर.डी.चे ________ प्रोजेक्ट शास्त्रज्ञ, विद्वान, लेक्चरर्स व इतर आर आणि डी संस्था ह्यांची एकत्रित डेटाबेस इनफ्लीबनेट’ या द्वारे संकलित करते. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options == 1. संस्कार 2. इ-टॅलंट 3. विद्वान 4. इ-रिसर्च.
Answer == विद्वान.
21) संगणकाच्या परिभाषेनुसार किलोबिट्स (Kb) या संज्ञेद्वारे किती बिट्स दर्शवले जातात ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options == 1. एक हजार बिट्स 2. एक हजार चौवीस बिट्स 3. एक हजार चाळीस बिट्स 4. वरीलपैकी नाही.
Answer == एक हजार चौवीस बिट्स.
22) संगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी टी. बी. (TB) ही संज्ञा नेमके काय स्पष्ट करते ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options:- A. संगणकाचा विषाणू
B. टेरा बिट्स
C. टेरा बाईट्स
D. वरीलपैकी नाही.
Answer == टेरा बाईट्स.
23) भारताच्या नियंत्रक सर्टिफाईंग अथोरिटिने खालीलपैकी कोणाला डिजिटल सर्टिफाईंग अथोरिटि म्हणून नेमले आहे ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options:- A. डी-मुद्रा
B. इ-मुध्रा
C. डी-सर्टीफिकेट
D. डि.सी.ए.
Answer == इ-मुध्रा.
24) SRAM, DRAM, EDO-RAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options :-A. रँडम अक्सेस मेमरी
B. रीड ओन्ली मेमरी
C. हार्ड डिस्क मेमरी
D. वरीलपैकी नाही
Answer == रँडम अक्सेस मेमरी.
25) संगणकाचा वेग वाढविण्याच्या उद्देशाने सी.पी.यू. व रॅम (CPU and RAM) यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options:- A. रॉम (ROM)
B. कॅश (Cache) मेमरी
C. हार्ड डिस्क मेमरी
D. वरीलपैकी नाही
Answer == कॅश (Cache) मेमरी.
26) खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options :- A. मदरबोर्ड
B. हार्ड डिस्क
C. सी.पी.यू.
D. वरीलपैकी नाही
Answer :- सी.पी.यू.
27) विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार अनुच्छेद 169 अन्वये संसदेला आहे.
ब. जेथे विधान परिषद निर्माण करावयाची आहे अथवा असलेली रद्द करावयाची आहे त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते.
क. संसदेमध्ये तसा ठराव/अधिनियम हा साध्या बहुमताने मंजूर केला जातो.
वरीलपैकी कोणते विधान /ने बरोबर आहेत ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options== A. फक्त अ
B. अ, ब, क
C. ब, क
D. अ, क
28) खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणे शक्य होते ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options A. पाचवे परिशिष्ट
B. सहावे परिशिष्ट
C. सातवे परिशिष्ट
D. दुसरे परिशिष्ट
Answer == सातवे परिशिष्ट.
29) खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options == A. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसेल तेव्हा मुख्यमंत्री नेमताना
B. पदावरील मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास नव्याने मुख्यमंत्री नेमताना
C. विधानसभेत बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास.
D. विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठींबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास.
Answer == D.
30)खालील विधाने विचारात घ्या. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options == अ. जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखालील जे.व्ही.पी. समितीने आपला अहवाल 1948 मध्ये सादर केला.
ब. द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले.
क. द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
A. अ, ब
B. अ, क
C. फक्त क
D. फक्त ब
Answer == फक्त क.
31)भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
(Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
Options ==अ). नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा दर्जा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीचा आहे. परंतु पदनाम तालिकेनुसार (Order of precedence) राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वरचा आहे.
ब) भारतीय लेखा व लेखा परीक्षण (Audit and Accounts Department) विभागामधील सेवेतील व्यक्तिंच्या सेवेच्या अटी नियंत्रक व महालेखापरीक्षक हे राष्ट्रपतीबरोबर सल्लामसलत करून निश्चित करतात.
A. विधान ‘अ’ बरोबर
B. विधान ‘ब’ बरोबर
C. दोन्हीही विधाने बरोबर
D. दोन्हीही विधाने चूकीची
Answer == विधान ‘अ’ बरोबर.
32) सचिवालय विभागाची योग्य पदसोपान परंपरा (hierarchy) _______ अशी आहे. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
A) सचिव – सह-सचिव – अतिरिक्त सचिव – अवर सचिव – उप-सचिव – सहाय्यक सचिव
B) सचिव – अतिरिक्त सचिव – अवर सचिव – सह-सचिव – उप-सचिव – सहाय्यक सचिव
C) सचिव – सह-सचिव – उप-सचिव – अवर सचिव – कक्ष अधिकारी
D)सचिव – सह-अवर सचिव – सहाय्यक सचिव – उप-सचिव
Answer :– Option C.
33) कॅबीनेट सचिवालयाची खालीलपैकी कोणते/ती कार्य/ये आहेत ? (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
अ. कॅबीनेटच्या बैठकीची विषयपत्रिका तयार करणे
ब. कॅबीनेट समित्यांना सचिवालयात्मक सहाय्य पुरविणे
क. मंत्र्यांना आर्थिक साधनांचे वाटप करणे
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Options:–
A) फक्त अ
B)ब आणि क
C) अ आणि ब
D) अ, ब आणि क.
Answer :– C.
34) खालील विधाने विचारात घ्या. (Maharashtra ASO Exam 2017- Main Paper 2).
अ. 95 व्या घटनादुरुस्ती अधिनियम – 2009 अन्वये लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ब. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद – 334 यात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत.
Options :–
A)विधान ‘अ’ बरोबर
B) विधान ‘ब’ बरोबर
C) दोन्हीही विधाने बरोबर
D) दोन्हीही विधाने चूकीची
Answer:– C.
35) भारतीय राज्यघटनेतील सातव्या परिशिष्टातील राज्यसूचीमध्ये नमूद केलेला/ले कोणता/ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आला/ले ?
अ. सार्वजनिक सुरक्षा
ब, पोलिस
क. जमीन
ड. कर
A) ब फक्त
B) अ, ब
C) अ, ब, क
D) अ, ब, क व ड
Answer:– Option C.
36.राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता असते ती त्याच्याजवळ असणे आवश्यक . असते.
ब. उच्च न्यायालयाच्या न्यायधीशास असणारे सर्व विशेषाधिकार फायदे के संरक्षण त्याला असते.
क. उच्च न्यायालयाच्या न्यायधीशास जे मानधन असते ते त्यास मिळते.
ड. राज्य मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत तो आपल्या पदावर राहतो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
A) अ, ब, ड
B) अ, ब, क
C) फक्त ड
D) फक्त अ
Answer:– Option D.
37) भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतूदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते ?
A. 73 वी संविधान दुरुस्ती
B. 86 वी संविधान दुरुस्ती
C. 87 वी संविधान दुरुस्ती
D. 91 वी संविधान दुरुस्ती
Answer:– Option D.
38) भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीकरीता उमेदवाराचे नामांकन ________ कडून सूचित केले जाते.
A. कमीत कमी भारताचे पाच नागरिक
B. कमीत कमी संसदेचे पाच सदस्य
C. कमीत कमी निर्वाचक मंडळाचे पन्नास सदस्य
D. कमीत कमी निर्वाचक मंडळाचे दहा सदस्य
Answer:– Option C.
39)भारतातील संविधानाचे कलम 75 चे खालील कोणत्या तरतूदी आहेत ?
अ. राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून मंत्र्यांची नियुक्ती करेल
ब. मंत्रिपरिषद लोकसभेस सामूहिकरीत्या जबाबदार असेल
क. राष्ट्रपतीला सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वात मंत्रिपरिषद असेल
ड. मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदेकडून ठरविले जातील
खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा.
A. अ, ब आणि क केवळ
B. अ, ब आणि ड केवळ
C. ब, क आणि ड केवळ
D. वरील सर्व
Answer:– Option B.
40)भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
A. पंतप्रधान
B. भारताचे मुख्य न्यायाधीश
C. संसद
D. विधी मंत्री
Answer:– Option C.
41) खालीलपैकी कोणत्या मान्यवरांस पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते ?
अ. राष्ट्रपती
ब. उपराष्ट्रपती
क. पंतप्रधान
ड. लोकसभा सभापती
A. अ फक्त
B. अ आणि ब
C. अ, ब आणि क
D. अ, ब, क आणि ड
Answer:– Option A.
42)
खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद-332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे.
ब. सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
क. सध्या महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
A. फक्त अ
B. अ, ब
C. ब, क
D. अ, ब, क
Answer:– Option D.
43.’शून्य प्रहर’ बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो असतो.
ब. त्याचा उल्लेख कामकाज पद्धतीच्या नियमांमध्ये आहे.
क. संसदीय कार्यप्रणालीतील भारतातील ही एक नाविण्यपूर्ण उपक्रम आहे.
ड. कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्यास सदस्य स्वतंत्र असतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
A. अ, ब, क
B. अ, क, ड
C. ब, क, ड
D. अ, ब, ड
Answer:– Option B.
44.राज्याच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात.
ब. ते राज्य विधिमंडळाच्या बैठका स्थगित करू शकतात.
क. ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळास संदेश पाठवू शकतात.
ड. जर विधेयक मार्गदर्शक तत्त्वाविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Options:–
A. अ, क, ड
B. अ, ब, क
C. ब, क, ड
D. अ, ब, ड
Answer:– Option A.
45)महाराष्ट्रातील विधिमंडळ समिती पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
A. मंत्री समितीचा सदस्य असू शकत नाही
B. जर उपसभापती हा समितीचा सदस्य असेल तर त्याची नेमणूक त्या समितीचा अध्यक्ष म्हणून केली पाहिजे
C. समितीचा सदस्य हो पुनर्नामांनासाठी पात्र असतो
D. समितीची गणसंख्या शक्यतो समितीच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांशच्या जवळपास असावी लागते
Answer:– Option D.
46.खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय संघराज्य हे राज्यांमधील कराराचा परिणाम आहे.
ब. ‘नाशवंत घटकांचा अविनाशी संघ’ (Indestructible Union of Destructible Units) असे भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.
क. ‘अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ’ (Indestructible Union composed of । Indestructible States) असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्णन केले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
A. अ, ब
B. फक्त ब
C. ब आणि क
D. फक्त क
Answer:– Option C.
47.विधान (A) : भारत सरकार कायदा, 1935 अनुसार शेषाधिकार केन्द्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते.
कारण (R) : भारत सरकार कायदा, 1935 अनुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती.
Options:–
A. A आणि R दोन्हीही बरोबर असून R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. A आणि R दोन्हीही बरोबर आहेत परंतु R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही
C. A बरोबर आहे तर R चूक आहे
D. A चूक आहे तर R बरोबर आहे
Answer :– Option D.
48.खालील विधाने विचारात घ्या
अ. स्वातंत्र्यप्राप्तिनंतरचे मुंबईचे पहिले शेरिफ हे शांताराम महादेव डहाणूकर होते
ब . शेरिफ हा उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो
क. मुंबई शेरीफचा कार्यकाळ पाच वर्षे आहे
ड. शेरीफचा मान महापौरांच्या खालोखाल असतो
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. ब आणि ड
D. क आणि ड
Answer:– Option C.
39.खालील विधाने विचारात घ्या :
अ. राष्ट्रपतीला, संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्ये राज्य शासनाच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्याच्या अधिका-यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील
ब. एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्ये, भारत सरकारच्या संमतीने, त्या सरकारकडे किंवा त्याच्या अधिका-यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील.
A. विधान अ बरोबर
B. विधान ब बरोबर
C. दोन्हीही विधाने बरोबर
D. दोन्हीही विधाने चूकीची
Answer:– Option B.
50.खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
A. 38 वी घटना दुरुस्ती अधिनियम, 1975 नुसार अनुच्छेद 356 लागू करण्यासाठी राष्ट्रपतीचे समाधान अंतिम व निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणासाठी आवाहन देता येणार नाही.
B. 44 वी घटना दुरुस्ती अधिनियम, 1978 नुसार राष्ट्रपतीचे समाधान हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही, असे सूचित केले आहे.
C. धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे म्हणून धर्मनिरपेक्षतेविरुद्ध धोरणे राबविणा-या राज्य सरकाराविरुद्ध अनुच्छेद 356 अन्वये कारवाई करता येते.
D. वरीलपैकी एकही नाही. Answer:– Option D.
51) खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्था सुचवली ?
A. बलवंतराय मेहता समिती
B. अशोक मेहता समिती
C. वसंतराव नाईक समिती
D. डॉ. एल. एम. संघवी समिती
Answer:– Option B.
52) पंचायत समितीला आसाममध्ये “________ ” म्हटले जाते.
A. आंचलिक पंचायत
B. जनपद सभा
C. महकमा परिषद
D. जिला पंचायत
Answer:– Option A.
53)बृहन मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा _______ प्रमाणे चालवली जाते.
A. 1988
B. 2001
C. 1888
D. 1788
Answer:– Option C.
54) महानगरपालिकेचे खालील कार्ये विचारात घ्या आणि त्यापैकी कोणती कार्ये अनिवार्य आहे ते ओळखा ?
अ. जन्म-मृत्यूची नोंद करणे
ब. पर्यावरण संरक्षण करणे
क. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची तरतूद करणे
ड. पूल व सार्वजनिक रस्त्यांची बांधणी व देखभाल करणे
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा
A. अ आणि ब
B. अ, ब आणि ड
C. अ आणि ड
D. वरील सर्व
Answer:– Option B.
55)महाराष्ट्रातील छावणी मंडळे (कटक मंडळे) आहेत
अ. कामठी
ब. बडनेरा
क. देवळाली
ड. खडकी
A. फक्त अ, ब, क
B. फक्त ब, क, ड
C. फक्त अ, क, ड
D. फक्त अ, ब, ड
Answer:– Option C.
56.नगरपालिकांनी काळजी घेतली पाहिजे अशा समाजातील ______ प्रकाराच्या दुर्बल घटकांचा विशेष उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे.
A. दोन
B. तीन
C. सहा
D. सात
Answer:– Option A.
57)नगरपालिकेशी संबंधित तरतूदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आली आहे ?
A. 72 वी घटनादुरुस्ती
B. 73 वी घटनादुरुस्ती
C. 74 वी घटनादुरुस्ती
D. 76 वी घटनादुरुस्ती
Answer:– Option C.
58.भारतात स्थापना झालेली पहिली नगर परिषद कोणती होती ?
A. बॉम्बे
B. कलकत्ता
C. मद्रास
D. दिल्ली
Answer:– Option C.
59.महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे महानगरपालिकेमधील स्थायी समितीमध्ये _______ सदस्य असले पाहिजेत.
A. 10
B. 12
C. 16
D. 15
Answer:– Option C.
60) 73 च्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे ?
A. 18 वर्ष
B. 25 वर्ष
C. 21 वर्ष
D. 30 वर्ष
Answer:– Option C.
61. 74 च्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला ?
A. 9 वी अनुसूची
B. 10 वी अनुसूची
C. 11 वी अनुसूची
D. 12 वी अनुसूची
Answer:– Option D.
62)भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या किती कार्यांची/जबाबदा-यांची यादी देण्यात आली आहे ?
A. 29
B. 18
C. 25
D. 22
63) जोड्या लावा – (भारतातील सामुदायिक विकास) :
A.
B.
C.
D.
Answer:–
94.
योग्य कथन/कथने ओळखा.
अ. मिझोराम, मेघालय व नागालँड या राज्यांना 73 वी घटना दुरुस्ती लागू होत नाही.
ब. 73 वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य मध्य प्रदेश आहे.
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ आणि ब दोन्हीही
D. अ आणि ब दोन्हीही नाही
95.
73 च्या घटना दुरुस्ती बाबत अयोग्य कथने ओळखा –
अ. या दुरुस्तीद्वारे पंचायत राज ला संवैधानिक दर्जा देण्यात आला
ब. या दुरुस्तीद्वारे पंचायत राज साठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली
क. या घटना दुरुस्तीने काही राज्यांना किंवा विशिष्ट प्रदेशांना सुट दिली आहे.
ड. या दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य हे राजस्थान ठरले.
A. फक्त अ, ब
B. फक्त ब, क
C. फक्त क, ड
D. फक्त अ, क
96.
खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निवाड्यानुसार सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नियुक्तीसाठी न्यायिक मंडळाची सुरुवात झाली ?
A. केशवानंद भारती निवाडा 1973
B. एस. पी. गुप्ता निवाडा 1982
C. सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असो. निवाडा 1993
D. रामास्वामी निवाडा
Answer:– C.
97.
खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर उत्प्रेषण रिट याचिका आदेशीत करता येत न
A. जेथे अधिकारक्षेत्र वापरण्यात चुक/गफलत झाली असेल
B. जेथे कायद्याची चुक/गल्लत झाली असेल
C. जेथे प्रथमदर्शनी तथ्यांची चुक/गल्लत झाली असेल
D. जेथे नैसर्गिक न्यायतत्त्वांचा भंग झाला असेल
Answer:– C.
98.
उच्च न्यायालयाच्या न्यायीक वे अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या लावा.
A.
B.
C.
D.
Answer:– D.
99.
खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायमूर्तीची संख्या वेळोवेळी निर्धारित केली जाते ?
A. भारतीय राज्य घटना अनुच्छेद 124(2)
B. भारतीय दंड संहिता, 1860
C. सर्वोच्च न्यायालय (न्यायमूर्तीची संख्या) अधिनियम, 1956 (
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer:– C.
100.
खालील विधानांचे अवलोकन करा.
अ. सक्रीय व कार्यक्षमपणे न्यायदान करणे हे न्यायालयीन सक्रीयतेचे मूलतत्त्व आहे.
ब, “अधिकृत याचिकाकर्ता” या नियमाचे उदारीकरण केल्यामुळे सार्वजनिक हितसंबंध याचिका (PIL) या प्रकाराचा उदय झाला.
वरील विधानांच्या अनुषंगाने खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
A. विधान ‘अ’ बरोबर असून विधान ‘ब’ चुक आहे
B. दोन्ही विधाने बरोबर आहेत परंतु त्यांच्यामध्ये कोणताही सहसंबंध नाही
C. दोन्ही विधाने बरोबर असून ते परस्परांशी सुसंगत आहेत
D. विधान ‘ब’ चुक परंतु ते विधान ‘अ’ ला पुरक आहे
Answer:– C.

